कोवीड १९ या महाभयंकर साथीच्या रोगापासून कोणतीही गोष्ट अबाधित राहिली असेल तर नवलच. कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे सगळेच व्यवसाय डबघाईला आले आहेत. प्रवासी व्यवसायाचे तर पूर्णपणे तीन तेरा वाजलेले आहेत. सततचा लॉकडाउन आणि लोकांच्या मनात प्रवासाबाबत निर्माण झालेली धास्ती या व्यवसायाला चांगलीच भोवली आहे. माझ्या माहितीनुसार कोरोनाव्हायरसनंतरचा प्रवास कायमचा बदललेला असेल. मी कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत नाही, परंतु मला असे वाटते की आपण सर्वजण नकीच यास सहमत असाल.
भविष्यात जेव्हा केव्हा ही परिस्तिथी आटोक्यात येईल तेव्हा माणस आपल आयुष्य पूर्वपदावर आण्यास बाहेर पडली तरी प्रवासा बाबतीतील त्यांचे मन नेहमीच संकुचित राहील . लोक लांबचा प्रवास करणे सहसा टळतील. देशात असलेल्या बहुतेक ट्रॅव्हल कंपनीचे दिवाळे निघाले आहे जवळपास पर्यटनाशी संबंधित सर्वच उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सर्वत्र पसरलेल्या या साथीच्या रोगामुळे भविष्यातील प्रवासावर कधीही न पुसला जाणारा प्रभाव टाकला आहे.
माझ्यासारख्या प्रवासासाठी उत्सुक असलेल्या असंख्य प्रवासवीरांचे मन अनेक विचारांनी भांबावून सोडले आहे.आपल्या पुढच्या सहलीचे नियोजन कधी, कसे आणि कोठे करावे याबद्दलचे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत.
0 Comments